Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

खान्देशांत जोरदार मुसंडी धुळे नंदुरबार सह जळगाव जिल्ह्यात महायुतीचाच बोलबाला.



साक्री प्रतिनिधी :- राज्यात विधानसमा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले. तसेच उत्तर महाराष्ट्रात जवळपास सर्वच विधानसभा क्षेत्रात भाजपाला घवाघवीत यश मिळाले त्यात धुळे शहरातून अनुप अग्रवाल यांनी आ.फारूख शाह यांचा दारूण पराभव केला.तर धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रातुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष हेवी वेट नेते आ.कुणाल पाटील यांचा भाजपाचे उमेदवार राम दादा भदाणे यांनी मोठया मटधिक्यानी पराभव केला.तसेच शिदखेडा तालुक्यामधुन मा.मंत्री आ.जयकुमार रावळ यांनी आपला गड शाबुत ठेवला शिरपूर तालुक्यातून काशीराम पावरा यांनी ही आपला विजय शाबुत ठेवला आहे.

साक्री विधानसभा मतदार संघातुन आ.मंजुळाताई गावित यांनी चुरशीची अशी निवडणूक घासून जिंकली आहे.तसेच आपल्या शेजारील नंदुरबार जिल्हयामधून नंदुरबार विधानसभा ह क्षेत्रातुन मंत्री विजयकुमार गावीत यांनी मोठा विजय मिळविला आहे.तसेच अत्यंत अटीतटीच्या लदतीमध्ये अक्कलकुवा मध्ये मा.मंत्री आ.के.सी.पाडवी यांचा पराभव करून विधान परिषदेचे आ.आमशा पाडवी अखेर विजयी झाले आहेत.शहादा विधानसभा क्षेत्रातून आ.राजेश पाडवी नेहमी प्रमाणे बाजी मारली.नवापूर विधानसभा क्षेत्रातून कॉग्रेसचे आ.शिरीष नाईक यांनी आपला गड राखला आहे.जळगाव जिल्ह्यात पूर्ण 11 पैकी 11 जागा महायुतीने जिंकून इतिहास रचला आहे.उत्तर महाराष्ट्र एकूण 42 जागेपैकी केवळ दोन जागा महाविकास आघाडीकडे अंत्यत दयनीय अवस्था आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध