Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिरपूर विधानसभा निवडणूक मतमोजणीची तयारी अंतिमटप्प्यात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शरद मंडलिक
शिरपूर विधानसभा निवडणूक मतमोजणीची तयारी अंतिमटप्प्यात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शरद मंडलिक
महाराष्ट्र विधानसभेच्या शिरपूर मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरळीत व शांततेत पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर,2024 रोजी मतदान पार पडले आहेत. शिरपूर विधानसभा निवडणुकीचे मतदानही सुरळीत व शांततेत पार पडले आहे. या निवडणुकीची मतमोजणी शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून मुकेशभाई पटेल टाऊन हॉल, शिरपूर येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले असून पोस्टल मतमोजणीसाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता ईव्हीएमवरील मतमोजणीस सुरूवात होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी, एक पर्यवेक्षक व एक सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिरपूर विधानसभा मतदार संघात एकूण 336 मतदान केंद्र आहेत. एका फेरीत 14 मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहेत. त्यानुसार मतमोजणीच्या एकूण 24 फे-या होतील.या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एकूण 250 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंडलिक यांनी दिली आहे.
केंद्रीय निवडणूक निरीक्षक रणजीत कुमार यांनी आज शिरपूर येथील मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील बंदोबस्त व मतमोजणी प्रक्रियेची माहिती घेतली व आवश्यक त्या सुचना दिल्यात. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक, कार्यकारी अभियंता श्री. पंडागळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माळी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा