Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

साक्री तालुक्यातील विकास कन्येची किमया तालुक्यातील तिरंगी लढतीत अखेर महायुतीच्या मंजुळा गावित यांनी विजय संपादन केला !



साक्री विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शिवसेना शिंदे गटाच्या आ. मंजुळा गावित यांनी गड राखत विरोधकांना धूळ चारली.मुळात आ.मंजुळा गावित यांनी मिळवलेल्या विजयाचे अनेक पैलू आहेत.त्यातील सर्वांत महत्त्वाचे व प्रमुख कारण म्हणजे विकास,विकास केवळ विकासच होय.तीस वर्षे विकासात मागे पडलेल्या साक्री तालुका मतदारसंघात गावित ताई यांनी पाच वर्षांत काय करता येऊ शकते.हे दाखवून देत जनाधार आपल्याकडे खेचले.म्हणूनच मतदारांनी विरोधकांना चारी मुंड्या चीत करत आ.ताईंना यांना दुसऱ्यांदा विधानसभेवर पाठवले आहे.
आ.मंजुळा ताई यांनी मतदारसंघात कामांचा सपाटा लावत आचारसंहिता जाहीर होण्यापर्यंत चौदाशे कोटींची कामे केली.आणि येथेच खऱ्या अर्थाने निवडणूक फिरली.याआधी मतदारसंघात केवळ कागदावर रस्ते व्हायचे प्रॉपर दुसरी कोणतीही कामे झालेली नव्हती.आ.गावित यांनी पाच वर्षांत जनसंपर्क व सर्वसामान्यांची कामे करणे म्हणजे विकास ही जी मानसिकता होती.आणि त्याच्या पुढे जाऊन विकासाची कामे काय असतात.आणि ती कशी करावी लागातात हे दाखवून दिले.मुळात त्यांनी अनेक गावांमध्ये तीस वर्षात मूलभूत विकासासाठी धडपडणाऱ्या नागरिकांच्या समस्या सहजतेने सोडवल्यात,एका-एका गावात कोट्यवधीची कामे केली.साक्री मतदारसंघात शेतकऱ्यांसमोर विजेची तांत्रिक समस्या होती त्यावरही कायमस्वरुपी मार्ग काडत तालुक्यात तीन ठिकाणी सप्टेंशन मंजूर करत तोही प्रश्न होता तो मार्गी लावला.गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही समस्या होती ती त्यांनी सहज सोडवली.आ.मंजुळा ताई यांनी किचकट समस्या सोडवल्याने या प्रश्नाशी संबंधित शेतकरी कमालीचे खुश होते,न होणारी कामे,आ.ताईंनी यांनी केल्याने त्यांनाच मतदान करणार असे उघडपणे शेतकरी बोलत होते.तीस वर्षांत विकासकामे होणे अपेक्षित असताना,ती न झाल्याने मतदारांमध्ये राग असल्याने
२०१९ मध्ये मंजुळा गावित यांना साक्री तालुक्याने अपक्ष निवडून दिले होते साक्री तालुक्याला नवा चेहरा मिळाला,मतदारांनी त्यावेळी त्यांच्या परड्यात मते टाकली त्याचा फायदा देखील साक्री तालुक्याला झाला 
पहिल्याच प्रयत्नात विधानसभेवर मोठ्या
अपेक्षाने अपक्ष आमदार म्हणून पाठवल्याने आ.मजुला ताई देखील
मतदारांच्या विश्वासात्ला तीळमात्रही तडा न जाऊ देता, खऱ्या अर्थाने विकासकामे केली. दुसऱ्या टर्मला सामोरे जाताना आ.गावित यांनी अनेकाविध विकासकामे केली.असे असूनही विरोधकांकडून त्यांची प्रतिमा कमिशनकल्या ताई म्हणवत डागळण्याचा प्रयत्न केला.परंतु विरोधकांचा हा डाव त्यांच्यावरच उपळला,एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण चौरे यांच्याशी दोन हात करत भाजप चे पंढरपूर उमेदवार मोहन सूर्यवंशी यांना देखील धोबीपछाड ताईंनी निचटता का होईना आपला विजय संपादन केला 
विरोधकांचा डाव त्यांच्यावर उधळला
पाच वर्षांतील कामांचा लेखाजोखा आ मंजुळा गावित मांडत असताना,त्यांच्या विरोधकांनी मात्र विकासकामांत दोष काढून आ.गावित ताई यांना कमिशनकन्या म्हणवत हिणवले.विरोधकांची ही बाब मतदारांना रुचली नाही.मतपेटीतून उत्तर देत विरोधकांचा मतदारांनी सुपडा साफ केला.तीस वर्षांत जेथे दळणवळणाची मूलभूत सुविधा नसताना मंजुळा गावित यांनी अनेक ठिकाणी कामे करूनही त्यांच्यावर विरोधकांनी टक्केवारी कमिशनकन्याचा डाग लावण्याचे काम केल्याने मतदारांना ही बाब रुचली नसल्याने आ.गावित यांच्या सुप्त लाटेत विरोधक चितपट झाले.व तालुक्याचा युवक युवती यांनी 
साक्री विधानसभा मतदारसंघाचा कारभार सोपवला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध