Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

थाळनेर खंडेराव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य यात्रेनिमित्त साफसफाई ची मागणी



थाळनेर(प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ऐतिहासिक खंडेराव मंदिर परिसरात उकिरडे व बाभळींच्या झाडांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. यात्रेनिमित्त या परिसरात साफसफाई करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे. 

याबाबत थोडक्यात वृत्त असे की दरवर्षी ऐतिहासिक चंपाषष्ठीला खंडेराव महाराजांची यात्रा  सालावादाप्रमाणे भरते. सदर यात्रा यापूर्वी सात दिवस चालायची. परंतु कालांतराने सदर यात्रा दोन-तीन दिवस भरते. यावर्षी देखील चंपाषष्ठीला ७ डिसेंबर २०२४ रोजी यात्रा आहे. 
   
खंडेराव मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बाभळीचे झाडे व उकिरडे यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच खंडेराया मंदिर कडे येणारा रस्त्यावर अतिक्रमण होऊन काटेरी बाभळीचे झाडे वाढल्यामुळे सदर रस्ता देखील बंद झाला आहे. त्यामुळे भाविकांना बस स्थानकातून फिरून यावे लागते. याबाबत भाविकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कडे तोंडी तक्रारी करूनही त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. या यात्रेत बाहेरगावून व्यवसायिक मोठ्या प्रमाणावर येतात. या व्यवसायिकांना मंदिर परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे या व्यवसायिकांना थाळनेर -मांजरोद रस्त्यावर आपले व्यवसाय थाटावे लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
ग्रामपंचायत ने यात्रेपूर्वी मंदिर परिसराची साफसफाई करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या च्या शेजारून जाणारा रस्ता मोकळा करून करावे अशी मागणी भाविकातून होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध