Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

महायुती सरकार ची लडकी बहीण योजना व हिंदुत्वाच्या अस्मितेची यशस्वी रणनिती करत मंजुळा गावीत झाल्या पुन्हा साक्रीचा आमदार



साक्री प्रतिनिधी दि.२५ तालुक्याच्या विधानसभा आमदार संघासाठी असलेल्या चुरशीच्या लढतीत अखेर विद्यमान आमदार मंजुळा गावित यांनी आपली बाजी मारली असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण चौरे यांचा निसटता पराभव करीत पाच हजार पाचशे चीर्याशी मतांनी आघाडी घेत त्यांनी आपल्याकडे विजयश्री खेसून आणण्यात यश मिळविले आहे.विधानसभा क्षेत्रासाठी एकूण १८ उमेदवार रिंगणात होते यापैकी महायुती आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवार वगळता अपक्ष उमेदवार असलेले मोहन सूर्यवंशी यांनी चुरस निर्माण केली असे दिसून येते 
होते मात्र त्यांची असलेली लढाई हे मतदारांच्या हृदयापर्यंत पोहोचायला कमी पडल्यामुळे त्यांना सदर लढतीतून मतदारांनी बाहेर काढल्याचे चित्र एकूण झालेल्या मतदारांवरून दिसते आहे.साक्री विधानसभा क्षेत्र एकूण तीन लाख ६५ हजार ४००७ मतदार असलेल्या या मतदारसंघात सुमारे दोन लाख ४२ हजार २५३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.तालुक्याचा आमदार 
कोण होणार याची उत्सुकता 
मतदारानंतर मतदारांना होती
विधानसभा निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी असा विषय मुळातच 
नव्हता विद्यमान आमदार मुंजळा गावित आणि प्रवीण चौरे यांच्यात काटे की टकर होणार ही चर्चा खरी ठरली असून अंतिम निकाल शिवसेना शिदे गटाच्या बाजूने लागला असून ५,५८४ मतांनी आघाडी घेत पुन्हा एकदा 
आ.मंजुळा गावित निवडून आल्या आहेत लोकसभा निवडणुकीत झालेला गोंधळ विधानसभा निवडणुकीत होणार नाही याची सतर्क ता बाळगत आमदार यांनी काळजी घेत कार्यकर्ते त्यांची मोट बांधली.साक्री शहर सह तालुक्यातील काही ठरवीक पुढारी यांनी येन निवडणुकीच्या 
वेळी त्यांची साथ सोडली ते विरोधात गेले त्याचबरोबर भाजपाचा एक नाराज गट काँग्रेस महाआघाडीच्या मदतीला धावल्याने निवडणुकीचे निकाल काय लागणार याची उत्सुकता शिकेला पोचली होती तथापि मतदान करून घेण्याचे नियोजन युवा कार्यकर्त्या ची भक्कम फळी भाजपाचे खंदे समर्थक व धुळे जिल्हा उप अध्यक्ष भाजप भैयासाहेब चंद्रजित पाटील, आमदार गावित यांच्यासोबत राहिल्याने त्यांनी विजय खेचून आणला व राजकीय खेळी करण्यात पटाईत असलेले तुळशीराम गावित यांची रणनीती यशस्वी ठरली आहे.साक्री विधानसभा निवडणुकीत आमदार मंजुळा गावित यांनी सुरुवातीपासूनच आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला साक्री शहरात खासदार खासदार 
श्रीकांत शिंदे यांची सभा तर 
मुख्यमंत्री यांची दहिवेल येथे जंगी सभा घेत विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न निवडणूक निकाल नंतर यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.साक्री मतदार संघ अनुसूचित
जमातीसाठी राखीव असल्याने अठरा उमेदवार निवडणूक रिंगणात उत्तरले होते यात महाविकास आघाडीचे प्रवीण चीरे आणि अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी तर महायुतीच्या सौं मंजुळा तुळशीराम गावित यांच्यात खरा सामना रंगणार याची चर्चा मतदारसंघात होती आणि ती खरी ठरली.पहिल्या फेरीपासून पंधराव्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे प्रवीण बापू चौरे मतांच्या आघाडीवर होते मात्र अखेरच्या २९ व्या फेरी पर्यंत चुरशीच्या लढतीत मंजुळा गावित यांनी ५५८४ मतांनी विजय मिळवत प्रवीण चौरे यांचा पराभव केला.अखेर कामाचा जोरवार 
विद्यमान आमदार मंजुळा गावित यांनी साक्री तालुक्यात राबवलेल्या विकासाच्या योजना आणि राज्यातील सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना तसेच लाडका भाऊ यांच्यासाठी राबवलेल्या रोजगार योजना शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांच्यासह सामान्य मतदाराला दिलेला दिलासा निकाल परिवर्तन करणारा ठरला आहे.त्यातच हिंदुत्वचा मुद्दा देखील खुपच प्रभावी ठरला होता त्यामुळे 
आमदार मंजुळा गावित यांना पुन्हा निवडून येणे शक्य झालें तर तालुक्याचा विकास होणार अशी धारणा मतदारांनी बाळगत आप आपल्या परिसरातील मतदारांनी एकत्र येत जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला करत महायुतीकडे वळून मंजुळा गावित गावित यांच्या झोळीत मताचे दान करून निवडून दिल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिवेल येथे आमदार मंजुळा गावित यांच्या समनार्थ प्रचंड जाहीर सभा घेत.विविध विकासाच्या योजना तालुक्यात राबवल्या आहेत. बंद पडलेला पां.का. कारखाना,पिंपळनेर ची दीनदयाला सहकारी सूत गिरणी सुरू करण्याच काम आमदार मंजुळा गावित यांना करायच आहे त्यांना पुन्हा निवडून या हे दोन्ही महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू करू आणि साक्री तालुका पुन्हा उर्जत अवस्थेत आनु असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून  मिळाल्याने गावित यांचा विजय निश्चित झाल्याचे जनतेकडून बोलले जात होते आणि ते जनतेने सत्यत ही उतरवले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध