Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

जानव्याला तिघांवर चाकू हल्ला , जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा



अमळनेर प्रतिनिधी : प्रेमसंबंधाच्या संशयावरून एकाने तिघांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील जानवे  येथे २४ रोजी रात्री १० वाजता घडली.
विजय उर्फ भाया साहेबराव पारधी यांनी दवाखान्यातून जबाब दिला की २४ रोजी रात्री १० वाजता गल्लीत मावस बहिणीच्या आरडाओरड चा आवाज आला. म्हणून तेथे जाऊन पाहिले असता अजय मंगल पारधी हा विजयची मावसबहिण सुनीता , पती राजेंद्र व मुलगा भटू याना शिवीगाळ करत होता. भटुवर प्रेमसंबधाचे आरोप करीत त्याला मारून टाकतो म्हणून धमकी देत होता. त्याचवेळी चुलत काकांचा मुलगा सुवालाल नाना पारधी, भास्कर बारकू पारधी हे आले आणि त्यांनी अजय पारधी याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने शिवीगाळ करत चाकूने सपासप वार केले. त्यात सुवालाल याच्या डाव्या बरगडीवर , उजव्या खांद्यावर तसेच पाठीवर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वार लागला. तेव्हा सुवालालची सुटका करायला गेलेल्या विजयच्या दंडाला चाकू लागला तर भास्कर पारधी याच्या मांडीला व दंडाला चाकू  लागला. हे पाहून आरोपी अजय ची आई मुन्नीबाई चाकू हिसकवायला आली असता तिलाही हाताला चाकू लागला.गावातील नागरिकांनी भांडण मिटवून १०८ रुग्णवाहिकेने दवाखान्यात दाखल करण्यात आले. विजयच्या जबाबवरून आरोपी अजय पारधी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम  १०९ , ११८(१), ११८(२),३३३,३५१(२),३५२ १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विकास देवरे , हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , रवी पाटील  यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गुन्ह्यांचा तपास  पोलीस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध