Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
"डॉ. राहुल घुले यांच्या सहकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; विकासाला मिळणार नवी गती"
"डॉ. राहुल घुले यांच्या सहकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; विकासाला मिळणार नवी गती"
परंडा, दि. ४ पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते डॉ. राहुल घुले यांच्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी, डॉ. सावंत यांच्या विकासात्मक दृष्टीकोनाने प्रेरित होऊन आणि मान-सन्मानाने दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे तसेच आदरामुळे हे सहकारी शिवसेनेत सामील झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अर्चनाताई दराडे यांच्या उपस्थितीत नितीन गुंजाळ, हरीश गाढवे, शाम पालके, मनीषा चौधरी यांच्यासह इतर अनेक मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश झाला.
शिवसेनेत नव्याने सामील झालेल्या या सदस्यांमुळे पक्षाचे स्थानिक पातळीवरील बळ वाढेल, तसेच जिल्ह्यातील विकासाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा मंत्री सावंत यांनी व्यक्त केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा