Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

नानक साई फाऊंडेशन चा पंजाब आणि महाराष्ट्रात घुमान यात्रे च्या माध्यमातून बंधू प्रेमाचा जागर...



नवी दिल्ली- नानक साई फाऊंडेशन ने पंजाब आणि महाराष्ट्रात घुमान यात्रे च्या माध्यमातून ११ दिवस बंधू प्रेमाचा जागर जगवला. दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून ही यात्रा आयोजित केली जाते. यात्रेत महाराष्ट्र मध्य प्रदेश सह १४० जण सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातुन नांदेड येथून निघालेली संत नामदेव घुमान यात्रा दिल्ली- अमृतसर- आनंदपूर साहिब, माता नैना देवी, वाघा बॉर्डर, कुरुक्षेत्र,पटियाला, नामदेव नगरी घुमान, लुधियाना, फतेहगड साहिब, गोविंदवाल साहिब, कार्तिकी स्वामी, लव कुश जन्मस्थळ रामतीर्थ,भाक्रा नांगल धरण आदीं धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देत नुकतीच दिल्ली मार्गे नांदेड येथे परत गेली. 
पंजाब सरकार च्या वतीने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर पटियाला येथे आणि रेल्वे राज्य मंत्री बिट्टू यांच्या तर्फे त्यांचे विशेष कार्य अधिकारी सरदार गुरुदीप सिंघ लुधियाना येथे स्वागताला उपस्थित होते. पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या नानक साई फाऊंडेशन ची १० वी संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा पंजाब हरियाणा हिमाचल दौरा केला. यात्रे चे हे १० वे वर्ष असून यात्रेच्या माध्यमातून पंजाब -हरियाणा -हिमाचल प्रदेश मधील धार्मिक ऐतिासिक स्थळांचे दर्शन-इतिहास -संस्कृती सोबत पर्यटनाचे अनोखे कॉम्बिनेशन मराठी माणसांना मनापासून आवडले. नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्र सिंघ जी व संत बाबा बलविंदर सिंघ जी यांच्या आशीर्वादाने ही यात्रा आयोजित केली जाते. नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतत्त्वाखाली ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. 

पंजाब -हरियाणा -हिमाचल प्रदेश च्या पवित्र देवभूमीची भेट घडवण्यासाठी ही कौटुंबिक सहल दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून आयोजित केली जाते. ऐतिहासिक धार्मिक स्थळा बरोबर ग्रामीण पंजाब जवळून पाहण्याचा योग घुमान यात्रे च्या माध्यमातून अनुभवायला मिळतो आणि त्यातून पंजाब ची संस्कृती व भाई चारा मजबूत करता येतो असा हेतू या चळवळीचा असल्याचे नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले. ११ हजार मराठी माणसाना पंजाब हरियाणा हिमाचल ची ऐतिहसिक देवभूमी चे दर्शन घडवण्याचा आमचा संकल्प आहे असे फाऊंडेशन च्या सेक्रेटरी सौ प्रफुल्ला बोकारे, संयुक्त सचिव श्रेयस बोकारे पाटील म्हणाले. यात्रा नुकतीच नांदेड येथे परतली असून नांदेडकरानी हुजुर साहिब रेल्वे स्टेशनवर पुष्प वृष्टीने यात्रेचे स्वागत केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध