Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

रजा न टाकता शाळेचे कर्मचारी राहतात गैरहजर!! केंद्र प्रमुख काय कारवाई करतात?



शाळेत रजा न टाकता आपले खाजगी कामे करत फिरायचे आणि शाळेत इतर दिवशी हजर झाल्यानंतर मागील दांड्या मारलेल्या दिवसाची हजेरी सह्या करून भरून घ्यायचा प्रकार सर्रासपणे सुरु आहे.

शाळेतील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

शासनाकडूनच भरगच्च पगार घ्यायचा आणि शासनाचीच फसवणूक करून दांड्या मारायच्या आणि मनाला पटेल तेव्हा मस्टरवर सह्या करून घ्यायच्या 'तेरी भी चूप मेरी भी चूप असा चित्रपट सध्या सुरु आहे.

प्रत्येक शाळेत आता हालचाल बुक कम्पलसरी करून एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक शिक्षक कुठे शाळेच्या कामानिमित्त बाहेर गेले असता त्या पुस्तकात तशी नोंद करण्याचे बंधनकारक करावे आणि गावातील शालेय समितीतील सदस्यांनी अचानक शाळेत भेटी देवून कोण ड्युटी सोडून गायब आहे याची चौकशी करून त्याची तक्रार जिल्हा परिषद सिईओ यांच्या कडे करून त्याची संपूर्ण माहिती गावातील व्हाट्सअप ग्रुपवर टाकावी जेणेकरून आपल्या मुलांना कोणकोणते शिक्षक शिकवत नाहीत याची माहिती गावाकऱ्यांना मिळणार आहे.

विद्यार्थ्यांनी सुद्धा कोणकोणते शिक्षक शाळा सोडून गायब राहतात किंवा शिकवत नाहीत याची माहिती कळवावी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध