Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४
थाळनेरला नागरिकाची बोगस घरकुल लाभार्थी चौकशी बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
थाळनेर(प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील बोगस घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करण्याची मागणी लेखी तक्रार गावातील नागरिक भटू लोटन बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की थाळनेर येथील दामसेरपाडा भागातील भटू लोटन बोरसे या नागरिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार सदर नागरिक भूमीहीन असून मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तरीदेखील त्यांना घरकुलाचा लाभ आज पर्यंत मिळाला नाही.
त्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तोंडी तक्रारी करून विनवण्या केल्या आहेत.त्यांनी आपल्या तक्रारीत पुढे असे म्हटले की थाळनेर गावात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. गावात काही नागरिकांना एका कुटुंबात दोन-तीन नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे तसेच त्यांचे पक्के घरे आहेत व बागायती शेती अशा लोकांनाही लाभ मिळाला आहे. तसेच दारिद्र्य रेषेखालील यादीत त्यांचा नंबर ४८२आहे त्या ठिकाणी कॉम्प्युटर चुकीमुळे त्या ठिकाणी बाबळा लोटन (पाटील) बोरसे हे नाव आहे.
परंतु या नावाची व्यक्ती गावात नाही आहे. गावातील घरकुल योजनेची चौकशी होऊन दोषीवर कायदेशीर करावी व मला न्याय मिळावा अशी मागणी संबंधित नागरिकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीने केली आहे. सदर नागरिकांना न्याय न मिळाल्यास ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा