Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

बंजारा ब्रिगेड संघटनेचा साक्री तालुका युवा अध्यक्षपदी चि.पंकज राठोड यांची सर्वानुमते नियुक्ती



 साक्री तालुक्यातील ढोलीपाडा येथील बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री पंकज शांताराम राठोड यांची बंजारा ब्रिगेड साक्री तालुका युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बंजारा ब्रिगेड भारत राष्ट्रीय अध्यक्ष मा.रविकांत भाऊ राठोड तसेच मा.तेजस भाऊ पवार खानदेश विभागीय अध्यक्ष व श्री.मिलीन भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष नंदुरबार यांच्या नेतृत्वाखाली श्री पंकज भाऊ राठोड यांची आज सोमवार दि.25 11/ 2024 रोजी नियुक्ती करून पत्र देण्यात आले.
पंकज राठोड यांची बंजारा ब्रिगेड साक्री  तालुका युवा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साक्री तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध