Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४
ना जाहीरनामा, ना व्हिजन,, चाललेत आमदार व्हायला
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे
अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना कोणताही जाहीरनामा ना कुठलेही व्हिजन दिसत नसून केवळ आमदार व्हायचे एवढाच अट्टहास आहे, यांच्या प्रचारात कुठेही सुज्ञ व जेष्ठ नागरिक दिसत नसून याउलट विकास पुरुष असलेल्या अनिल पाटलां सोबत जेष्ठ श्रेष्ठ मंडळी भक्कमपणे उभी असल्याचा दावा माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की शिस्तबद्ध आणि अभ्यासू व्यक्तीमत्व कस असावं हे आपण मंत्री अनिल पाटील यांच्या रूपाने अनुभवत असून युवा दशेत असताना चळवळीतुन उदयास आलेलं हे व्यक्तिमत्व आहे. सहकार क्षेत्र असेल किंवा विविध संस्था असेल यावर काम करून पुरेसा अनुभव घेऊन घडलेलं हे व्यक्तिमत्व आहे. 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कुठलाही डाग नाही, कुणाची फसवणूक नसुन, सुसंस्कृतपणा नेहमीच त्यांच्यात दिसुन आला आहे. आमदार झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात शाश्वत असा विकास करून विकासाचे व्हिजन देखील त्यांनी दाखवून दिले आहे.
तर दुसरीकडे विरोधी उमेदवार असलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आमदारकी जाऊन पाच वर्ष उलटली तरी देखील त्यांनी गाडीवरचे सिम्बॉल काढलेले नाही, तसेच पाच वर्षांपासून घरावरील आमदार कार्यालय हे नाव आजही जशेच्या तसेच आहे. याला बालहट्ट म्हणावा का.? यांनी मागील जाहीरनाम्यात सूतगिरणी उभारण्यात येईल असे लिहिले होते मात्र जागा घेऊन सूतगिरणीचे अनुदानही लाटले असल्याचे समजले आहे.भारतीय जनता पार्टीचे आपण सद्स्य आहेत असे दर्शवून जनतेची दिशाभूल करीत असताना पक्षाने त्यांना निकासीत केले आहे. तरी देखील ते पत्र खोट असल्याचे सांगून पक्षाच्या निर्णयाला देखील ते खोटं ठरवीत आहेत. साडेचार वर्षात अमळनेर कडे दुर्लक्ष करणारे चौधरी बंधु निवडणूक येताच उगवल्याने जनतेनेही त्यांना ओळखले असून आता कितीही जातीवाद केला आणि कितीही भूलथापा मारल्या तरी संपूर्ण जनता भूमिपुत्र अनिल दादा यांच्याच पाठीशी राहील असा दावा त्यानी केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा