Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४
डॉ.अनिल शिंदेंना शरद पवारांनी दिला विजयी भवं असा आशीर्वाद,
पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन,
अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे या दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी अमळनेर मतदारसंघातून डॉ. अनिल शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.
या सभेस दोन्ही तालुक्यातून शेतकरी, युवक व महिलावर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत असून शेतमालाला भाव मिळत नाही, तरूणांना नोकऱ्या नाहीत, महिलांवर अत्याचार केला जातो. बिकट अवस्था आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे.
त्यानंतर खा. पवार म्हणाले की, जवळचा मतदारसंघात डॉ अनिल शिंदे चांगले नेतृत्व आज उच्चशिक्षित आहेत, हा अतिशय साधा भोळा माणूस असून अमळनेकरांनी मोठ्या मतांनी डॉ.अनिल शिंदे यांना विजयी करा, अशी भावनिक साद घातली. यावेळी डॉ शिंदे यांनी शरदचंद्र पवार यांच्या पाया पडतांना भावनिक होत डॉ शिंदे यांना अश्रू अनावर झाले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा