Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

निवडणूक काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल हेडकॉन्स्टेबल नरेंद्र वारुळे याना प्रशंसा पत्र देऊन गौरव



अमळनेर प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल टी एम सी चे हेडकॉन्स्टेबल नरेंद्र वारुळे यांचा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी  यांनी प्रशंसा पत्र देऊन गौरव केला आहे.



विधानसभा निवडणुकीत जिल्हा घटकांची वरिष्ठांना लागणारी माहिती तयार करणे , कामकाजात समर्पण व कठोर परिश्रम घेतल्याने निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. म्हणून पोलीस अधीक्षक रेड्डी आणि पोलीस ऑब्झर्व्हर तौहीद परवेज यांनी प्रशंसा पत्र  देऊन वारुळे यांचा गौरव केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध