Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

वासरे येथे हाणामारी प्रकरणी दुसऱ्या गटातर्फेही गुन्हा दाखल



अमळनेर प्रतिनिधी: तालुक्यातील वासरे येथे किरकोळ वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी दुसऱ्या गटानेही तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १७ रोजी संध्याकाळी फिर्यादी महिला व तिची जेठानी घराबाहेर वाळत टाकलेले कपडे काढत असताना समोर राहणारे विलास माधव पाटील हे दारू पिऊन शिवीगाळ करू लागले. फिर्यादीचे सासरे शंकर रघुनाथ पाटील हे त्यास समजवायला गेले असता संदीप विलास पाटील हा त्यांना काठीने मारू लागला. त्यावेळी फिर्यादी व तिची जेठाणी सासऱ्यांना सोडवायला गेली असता संदीपने त्यांनाही चापट बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मिनाबाई विलास पाटील हिने तिघांना शिवीगाळ केली. शंकर पाटील याच्या डोळ्याला व पोटात मार लागल्याने धुळे येथे उपचार घेतल्यानंतर तक्रार दाखल केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध