Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ डिसेंबर, २०२४
घर फोडून दोन लाखाचे दागिने व रोख लंपास
अमळनेर : काकूंच्या प्रेतयात्रेला गेलेल्या सैनिकाच्या घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे दोन लाखाचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ६ ते ९ डिसेंबर दरम्यान पिंपळे रोडवर घडली.
उदय हिम्मत पाटील रा सुंदरनगर जयहिंद पार्क पिंपळे रोड यांची अमळगाव येथील काकू मयत झाल्याने ते ६ रोजी घराला कुलूप लावून पत्नीसह अमळगाव गेले होते. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता ते घरी परतले तेव्हा त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडलेला दिसला. घरातील बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसला. कपाटाचे ड्रावर फेकलेले आढळून आले. बेडरूम मधील गादी खालील मका विकून आलेले एक लाख रुपये रोख, १ लाखांची सोन्याची पोत , २ हजार रुपयांचे चांदीचे ब्रासलेट असे चोरीस गेलेले आढळले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे ,एपीआय जगदीश गावित यांनी भेट देऊन पंचनामा केला.
उदय पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय जगदीश गावीत करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा