Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

अमळनेर येथिल महिला पोलिसाचा विनयभंग


दै.तरूण गर्जना रिपोट

अमळनेर प्रतिनीधी: क्रिकेटचा बॉल घेण्यासाठी सरळ घरात येणाऱ्या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिसाचा विनयभंग व पोलिसांना अश्लील शिवीगाळ दमदाटी करण्याचा प्रकार १० रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ताडेपुरा भागात घडली.

सातारा जिल्ह्यात पोलीस दलात असणारी महिला सुटीवर अमळनेर येथे ताडेपुरा भागात आलेली होती. दुपारी ३ वाजता आजी आजोबांच्या घरात झोपलेली असताना गल्लीत काही मुले क्रिकेट खेळत होती. अचानक खेळणाऱ्यांचा बॉल घरात आला तो घेण्यासाठी मोहिन उर्फ मोना सलीम खाटीक हा सरळ घरात आला. त्यावेळी महिला पोलिसाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मोहीन ने तिच्या शरीराला हात लावून घरात प्रवेश केला आणि तिला शिवीगाळ केली. तिची आई तेथे आली असता पोलिसांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करून तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या म्हणत दमदाटी केली. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ७४,२९६,३५२ ,३२९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात लसूण तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध