Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४
मंगरूळ एमआयडीसीत डोक्यात दगड मारून एकाचा खून
सोबत आलेल्या संशयिताने खून केल्याचा संशय , पकडायला पथक रवाना
अमळनेर : डोक्यात दगड टाकून एका तरुणाचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ येथील एम आय डी सी मध्ये घडली. तुषार चिंधु चौधरी वय ३७ असे मयताचे नाव आहे.
तुषार हा मूळचा मारवड येथील रहिवासी असून तो प्रताप मिल कंपाऊंड मध्ये राहत होता. तो शेत व प्लॉट विक्रीचा व्यवसाय करतो. ५ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास तो आई रंजनाबाई व पत्नी पूजा याना दहा मिनिटात येतो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तुषार घरी आला नाही म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेतला होता. त्याचे लोकेशन काढले असता ते मंगरूळ पर्यंत दाखवत होते. मात्र तुषार चा पत्ता लागत नव्हता. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तुषार मंगरूळ येथे जखमी अवस्थेत पडला असल्याचे समजले. तुषार याच्या कपाळावर डोक्यावर दगडाने वार केलेला होता. त्याच्या डाव्या कानाजवळ व डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखमा होत्या. घटनास्थळी प्रभारी डीवायएसपी धनंजय वेरूळ , पोलीस निरीक्षक विकास देवरे , पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल , हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , मिलिंद बोरसे ,सागर साळुंखे , पोलिस पाटील भागवत पाटील यांनी भेट दिली. तुषार याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ञ याना पाचारण करण्यात आले.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तुषारच्या घरापासून तर मंगरुळपर्यंत रस्त्यात असलेले सRव सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात तुषार हा एका जणाबरोबर मोटरसायकलवर आलेला दिसून आला. जाताना मात्र तो एकटा जातांना दिसला. संशयित आरोपी हा पोलिसांच्या नजरेत असून त्याला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. संशयित आरोपी निश्चित करण्यासाठी एलसीबी पोलिसांचे सहकार्य लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा