Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

शिरपूर येथे महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन



शिरपुर प्रतिनिधी:-भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:०० वा.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस प्रांतअधिकारी शरदजी मांडलिक, तहसीलदार महेंद्रजी माळी, डीवायएसपी सुनील गोसावी साहेब,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेब,मा.राजगोपालजी भंडारी,पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नायब तहसीलदार अधिकारजी पेंढारकर मा.नगरसेवक आयु.गणेश भाऊ सावळे मा. नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट, मा नगरसेवक बाबूदादा खैरनार,पोलीस टू डे पत्रकार रत्नदीप सिसोदिया, प्रशासकीय अधिकारी शिरपूर न पा संजयजी हसवानी या सर्व मान्यवरांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन केले. तदनंतर सामूहिक वंदना घेऊन महामानवास मानवंदना देण्यात आली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, खालचेगाव बौद्धवाडा, व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील प्रतिमांना देखील आदरांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी भीमराव दादा मोरे, प्रताप सरदार,ॲड. युवराज ठोंबरे, सुनील बैसाणे,दिनेश सावळे, शौकीन कुवर,मूलचंद शिरसाट,अशोक ढिवरे, भटू पवार,बापू इंदासे, बन्सीलाल शिरसाट, मारुती वाल्हे, लोटन थोरात,जे.डी कुवर, विजयानंद शिरसाट, प्रबुद्ध शिरसाट, हिम्मत सैंदाणे, दत्ता थोरात, गौतम थोरात, मच्छिंद्र थोरात, चंदन सोनार, किरण कढरे, संजय जगदेव, राजू खैरनार, श्याम चांदे, खंडू महिरे, प्रताप देवरे, प्रकाश पवार व मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध