Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ डिसेंबर, २०२४
पाण्यात बैलांसह गाडीही बुडाली .मुडी, मांडळ येथिल घटना
शेतकरी वृद्ध असल्याने सुदैवाने बचावला
अमळनेर : पाणी पिण्यासाठी पांझरा नदीत बैलांनी बैलगाडीसह धाव घेतली आणि वालखेडा येथील कोल्हापूर बंधाऱ्यात बैलांसह गाडी बुडाल्याची घटना १७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
पांझरा नदीकाठावर कोल्हापूर बंधाऱ्याच्या जवळ शेती असलेल्या भावाच्या शेतात सर्जेराव तुकाराम शिंदे वय ७५ हे बैलगाडी घेऊन शेतात काम करण्यासाठी गेले. काम झाल्यानंतर सायंकाळी घरी परतत असतांना बैलांना पाणी पाजण्यासाठी बैलगाडी जुंपली. पाणी पाहताच बैलांनी पाणी पिण्यासाठी थेट नदीतच धाव घेतली. बैलगाडी थेट बंधाऱ्याकडे निघाली मात्र काठावर खड्डा असल्याने थेट खड्ड्यात पडली. गाडी लोखंडी असल्याने थेट बैलासह गाडी बुडाली. सर्जेराव वृद्ध असल्याने ते बैलांच्या मागे पळू शकले नाही म्हणूनच ते बचावले अन्यथा बैलांसह तेही बुडाले असते. ही बातमी मासे पकडण्याऱ्या व्यक्तींनी गावात कळवली. माहिती मिळताच त्यांचा मुलगा आशिष याने शेतात धाव घेतली. व वडिलांना घेऊन घरी आला.
डोळ्यासमोर बैलजोडी आणि गाडी बुडल्याने हताश होऊन शिंदे बेशुद्ध झाले. एक लाखाची नवी जोडी आणि गाडी ५० हजाराची असे दीड लाखांचे नुकसान झाले. रात्र झाल्याने बैलांचा आणि गाडीचा शोध घेता आला नाही. दरम्यान या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी मारवड पोलिसांना कळविली असून सकाळी बैलगाडी काढण्यासाठी बाभळे येथून मोठी क्रेन मागविली गेली आणि क्रेनच्या साह्य्याने बैल व गाडे बाहेर काडण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा