Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

पोलीस पाटील बनले शिक्षक;सोन खुर्द व खुर्चीमाळ येथील प्रकार; घेत आहेत दोन पगार



नंदूरबार प्रतिनिधी: नंदूरबार जिल्ह्य़ातील काही गांवाचे पोलीस पाटील हे चक्क शिक्षकाची नोकरी करीत आहेत. अशा एकच व्यक्ती दोन पदांवर काम करून दोन्ही पदांचे मानधन घेणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
                 
प्रत्येक गांवात गांवात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटीलांवर असते.पोलीस पाटिलाला दरमहा १५००० रूपये पगार दिला जातो.महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६३ च्या तरतुदीनुसार पोलीस पाटीलाची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाते. बाॅम्बे वॅलेज पोलीस ॲक्ट अनुसार त्यांना विविध कर्तव्ये पार पाडावी लागतात. गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित असते.पोलीस पाटील हे एक प्रकारचे सरकारी पद आहे.परंतु काही गावांतील पोलीस पाटील पदावर असणारे व्यक्ती हे  मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शिक्षक म्हणून १०००० रूपये  मानधन तत्वावर काम करीत आहेत, अशा तक्रारी संघटनेस प्राप्त झाल्या आहेत.उदाहरणार्थ- अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ, धडगांव तालुक्यातील सोन खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोलीस पाटील काम करीत आहेत. 
                   
एकच व्यक्ती दोन्ही वेगवेगळ्या पदांवर काम करून पदांना न्याय देऊ शकत नाहीत. अशे व्यक्ती हे शासनाची दिशाभूल करून दोन्ही पदांवरचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक करीत आहेत. कोणत्याही व्यक्तीस फक्त एकाच पदावर काम करण्यास प्राधान्य देण्यात यावे.पोलीस पाटील पदावरील उमेदवारांस  मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुन्हा  शिक्षक म्हणून नेमणूक करणा-या संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.

ही योजना बेरोजगारांसाठी आहे,तरी गरजू व बेरोजगार उमेदवारांना डावलून पोलीस पाटील पदांवर असणा-या उमेदवारांस शिक्षक म्हणून आदेश देण्यात आले आहेत. हे गरजू उमेदवारांवर अन्याय कारक बाब आहे. म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ातील पोलीस पाटील पदांवर असणारे व्यक्ती हे  बेकायदेशीर शिक्षक व इतर पदांवर  काम करीत आहेत व दोन्ही पदावरचे मानधन घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करीत आहेत. म्हणून अशांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध