Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

जळगाव आरटीओ कार्यालयात एसीबीचा ट्रॅप, मोठा अधिकारी जाळ्यात!



जळगाव प्रतिनिधी:- दि.५ डिसेंबर २०२४ जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत कारवाई केली आहे. मोठ्या अधिकाऱ्यासह एक कर्मचारी ३ लाखांची लाच घेताना रंगेहाथ सापडला असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुख्य अधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वीच दीपक पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या बदलीनंतर अनेक महिने ते पद रिक्तच होते. गुरूवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावत कारवाई केली.

माहितीनुसार एका अधिकाऱ्याची दुसऱ्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी ३ लाखांची लाच मागितली होती.पडताळणी अंती खात्री पटल्यावर पथकाने सापळा लावून कारवाई केली. सध्या दोघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले असून तपास सुरु आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध