Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

मध्यरात्री भर रस्त्यात महिलेने दिला एका सुंदर बाळाला जन्म


अमळनेर प्रतिनिधी : मध्यरात्री भर रस्त्यात मेंढपाळ महिलेला प्रसूती व्हावे लागण्याची वेळ आल्याने सामाजिक कार्यकर्ते तिच्या मदतीला धावून तिला उपचारासाठी पुढे नेल्याची घटना ३ रोजी पहाटे घडली. बिलखेडा येथील मेंढपाळ महिला व तिचे कुटुंब अमळनेर तालुक्यातील फापोरे शिवारात उतरले होते.

रात्री १२ वाजेच्या सुमारास तिला प्रसूती कळा येऊ लागल्याने ती वाहनाने जात असताना अचानक राजहंस चौकात तिला अधिक त्रास होऊ लागला म्हणून गाडी थांबवून ती खाली उतरली आणि रस्त्याच्या बाजूला जाताच ती प्रसूत झाली अन तिला मुलगा झाला. तिला तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत आणि बाळ सुरक्षित रहावे, वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून तिला माऊली हॉस्पिटलचे डॉ राहुल काटे यांच्याकडे नेण्यात आले. त्या महिलेला संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज शेटे, संदीप महाजन, धनराज पाटील, जयपाल देसले यांनी वेळीच मदत केल्याने बाळ आणि महिला सुरक्षित आहे. संकल्प फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि समाजसेवक यांच्या चांगुलपणाचे सर्वांनी कौतुक केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध