Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

सागर ने पुजासाठी तुषारचा केला खुन


तुषार चिंधु चौधरी याचा खून दोंडाईचा मालपूर येथील सागर बापू चौधरी वय ३० याने केल्याचे निष्पन्न झाले असून तुषारची पत्नी पूजा आणि सागर यांच्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सागर बापू चौधरी आणि पूजा चौधरी यांच्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. आणि सागर अनेकदा अमळनेर येथे येऊन तो पुजाला घेऊन बाहेर जात होता. सागर याला एक मुलगी असून त्याची पत्नी माहेरी निघून गेल्याने त्याने पूजाशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. पूजाने देखील त्याच्या सोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. सागर ने तुषार चा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पूजा तुषार ला मारू नको असे सांगत होती. मात्र अडथळा कायमचा दूर करण्याचा निर्णय सागर ने घेतला होता. पूजाने सागर ला बोलावून घेतले होते. पती तुषार याला सांगितले की माझा नातेवाईक येत आहे तुम्ही त्याच्या सोबत पत्रिका वाटायला जा. सागर आल्यावर त्याने तुषार ला सोबत घेतले आणि दारू प्यायला घेऊन गेला आणि मंगरूळ येथे जाऊन त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला.
पोलिसांनी मोबाईल , सीसीटीव्ही कॅमेरे आदी बाबी तपासल्या. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी कैलास शिंदे , मिलिंद सोनार , अमोल पाटील , शेखर साळुंखे , निलेश मोरे ,विनोद सदाशीशीव ,उज्वल म्हस्के , नितीन कापडणे , प्रशांत पाटील , जितेंद्र निकुंभे , पूनम हटकर यांच्या पथकाला दोंडाईचा येथे पाठवले. सागर याने मोबाईल बंद करून ठेवला होता. त्याचे मोबाईल चे दुकान होते. खुनानंतर काही तासात ६ रोजीच दुपारी दीड ते दोन च्या सुमारास पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौकशी केल्यावर प्रेम कहाणी उघडकीस आली. त्यांनतर तुषार याची अंत्ययात्रा झाल्यानन्तर पूजाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. खुनाचा तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध