Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ जानेवारी, २०२५
Home
/
Unlabelled
/
मोठी बातमी 26 जानेवारीला या 21 नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार ! नवीन जिल्ह्यांची यादी पहा
मोठी बातमी 26 जानेवारीला या 21 नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार ! नवीन जिल्ह्यांची यादी पहा
राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी अहमदनगर जिल्ह्याचे त्रिभाजन,नाशिक,ठाणे जिल्ह्यांचे दुजाभन,तर तब्बल १७ जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी २०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील समितीने सादर केलेल्या २२ जिल्हे व ४९ तालुके निर्मितीच्या प्रस्तावाला गती आली आहे.
लातूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या विभाजनातून उदगीर हा जिल्हा निर्माण केला.येत्या २६ जानेवारीपासून हा जिल्हा अस्तित्वात येणार आहे.
१ मे १९६० रोजी राज्याच्या निर्मितीवेळी २५ जिल्हे होते.तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातून दक्षिण सातारा जिल्हा वेगळा
करून २१ नोहेंबर १९६० रोजी सांगली हा नवा जिल्हा निर्माण झाला आहे.१९६० ते १९८० या २० वर्षांच्या कालावधीत एक सुध्दा नवा जिल्हा निर्माण झाला नाही.ए.आर.अंतुले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १ मे १९८१ रोजी राभागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यातून जालना या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली.बाबासाहेब भोसले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर, तर २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १ ऑक्टोबर १९९० रोजी बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे करण्यात आले होते.
१ जुलै १९९८ रोजी मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम आणि धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदूरबार या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकालात १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्यातून हिंगोली आणि भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली होती.
आताच जिल्ह्यातून नवीन जिल्ह्याची निर्मिती खालील प्रमाणे होणार
१)जळगाव : भुसावळ
२) लातूर : उदगीर
३)बीड : अंबेजोगाई
४)नाशिक : मालेगाव आणि कळवण
५)नांदेड : किनवट
६)ठाणे : मीरा-भाईंदर आणि कल्याण
७)सांगली/सातारा/सोलापूर
८)बुलडाणा : खामगाव
९) पुणे : बारामती
१०) यवतमाळ : पुसद
११) पालघर : जव्हार
१२ ) अमरावती : अचलपूर
१३ ) भंडारा : साकोली
१४ ) रत्नागिरी : मंडणगड
१५) रायगड : महाड
१६) अहमदनगर : शिर्डी संगमनेर व श्रीरामपूर.
१७) गडचिरोली : अहेरी.
मोठी बातमी 26 जानेवारीला या 21 नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार !
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा