Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ जानेवारी, २०२५
एस टी बसच्या धडकेत महिला जागीच ठार
पती गंभीर जखमी,एस टी चालकाविरुद्ध फिर्याद
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ शिवारात धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कुल जवळ एस टी बस व दुचाकी च्या झालेल्या अपघातात दुचाकीवर असलेली खडके येथील महिला जागीच ठार तर तिचा पती गंभीर जखमी झाल्याची घटना 21 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
अरुणाबाई समाधान राजपूत वय 49 असे मयत महिलेचे नाव असून ती व तिचे पती समाधान रुपसिंग राजपुत दोन्ही राहणार खडके हे दुचाकी ने अमळनेर कडून खडके येथे जात असताना समोरून येणाऱ्या कल्याण रावेर एस टी बसने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला अरुणाबाई या जागीच ठार झाल्या तर समाधान हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशन येथे दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी व त्यानंतर पोलिसात धाव घेऊन एस टी चालक विरुद्ध फिर्याद दिली आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा