Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५
रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरासाठी सतत योगदान देणार-आ.अनिल पाटील
रणाईचे येथे भक्तनिवास सह विविध विकास कामांचे भूमिपूजन
अमळनेर-तालुक्यातील रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरातील महंत बाबांचा मला नेहमीच आशीर्वाद राहिला असून माझी देखील या देवस्थांनावर मोठी श्रद्धा आहे.यामुळे मंदिर परिसरात विकासासाठी माझे
साठी सतत योगदान राहील अशी ग्वाही माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी रणाईचे येथे श्री चक्रधर स्वामी महाराज मंदिरात विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी दिली.
रणाईचे येथे श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिर येथे भक्तनिवास बांधकाम करणे 40 लाख रुपये, रणाईचे गावासाठी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे 25 लाख रुपये असे एकूण 75 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते तर परमपूज्य महंत बिडकर बाबा, परमपूज्य महंत सर्वज्ञ बाबा, मा.जिल्हा परिषद सदस्य सौ.जयश्री अनिल पाटील,माजी नगरसेवक भाईदास महाजन, प्रा.सुरेश पाटील, जे.व्हि. पाटील, हेमंत पाटील, प्रदीप इंदुलकर, प्रदीप पाटील , हिरालाल पाटील, विवेक पाटील, संजूबाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी आमदारांनी श्री चक्रधर स्वामी आश्रमासाठी निधी कमतरता भासु देणार नाही,प्रत्येक महोत्सवात मी सहभागी होत असतो याशिवाय रणाईचे येथे रस्त्यांसाठी व गावातील विविध विकास कामांसाठी भविष्यात अशीच भरीव निधींची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक भक्त उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा