Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

स्थानिक पुढा-याच्या वरदहस्तामुळे परप्रातीयाने केले अतिक्रमण!! स्थानिक पुढा-यापुढे शिरपूर नगर प्रशासन देखील झाले हतबल



शिरपुर प्रतिनिधी- शिरपूर तालुका म्हटले म्हणजे सर्वप्रथम सर्वसामान्याच्या डोळ्यासमोर येते ते, शिरपुर नगरचे भाग्यविधाते व विकासपुरुष मा, आमदार अमरीशभाई पटेल. त्यांच्या कार्यामुळे व कर्तृत्वामुळे शिरपूरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आदराने घेतले जाते. तसेच शिरपुर म्हणजे स्वच्छ, शांतताप्रिय व जवळपास सर्व सुविधानीयुक्त शहर म्हणून ओळखले जाते. असे असले तरी समाजातिल ठराविक स्थानिक राजकारण्यांचा आप-आपल्या स्थानिक परिसरात थोडाफार प्रभाव आहेच. अश्याच एका स्थानिक पुढा-यांच्या संगनमतीने त्यांच्याकडे काम करणा-या परप्रांतीय व्यक्तीने नगर प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता. नगर प्रशासन हद्दीत अतिक्रमण केले आहे. आमच्या प्रतिनिधीस मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक नागरीकांनी याबाबत नगर प्रशासनाकडे तक्रार करुन देखील आजपावतो कोणतीही कारवाई केलेली नाही,

सविस्तर वृत्त असे की, शिरपूर शहरातील शिरपूर ते करवंद नाका रस्त्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या केसर नगर जवळ एका राजस्थानी व्यक्तीने स्थानिक राजकिय व्यक्तिकडून रोहाऊस खरेदी केला. सदर राजस्थानी व्यक्ती हा स्थानिक पुढारी यांच्याकडे कामाला असल्याचा फ़ायदा घेत, त्यांने जवळपास ८-१० फुट अतिक्रमण करत रोहाऊसच्या शेजारी पत्राचा शेडचे बांधकाम केले आहे. याबाबत स्थानिक नागरीकांनी शिरपुर-वरवाडे नगरपरिषेकडे तक्रारी अर्ज देखील केलेले आहे. 

मात्र नगर प्रशासनाकडून आजपावतो कोणतीही कारवाई होत नसल्याने त्या स्थानिक नागरीकाने वृत्तमिडीयाचा आधार घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीजवळ आपली कैफियत सादर केली, यावर आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यातील सत्यता दिसून आली, त्यावेळीस परिसरातील नागरीकानी स्थानिक पुढा-याच्या वरहस्तामुळे परप्रातीयाने दादागिरी करत अतीक्रमण केले असून शिरपूर शहरात असे प्रथमता घडत आहे. आणि विशेष म्हणजे नगर प्रशासन देखील त्यांच्या समोर हातबल असल्याचे सांगितले.आता तरी नगर प्रशासनाने तात्काळ कारवाई करुन सदर अतिक्रमण जमीन दोस्त करावे अशी अपेक्षा सदर परिसरातील नागरीकांची आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध