Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ मार्च, २०२५
Home
/
Unlabelled
/
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागांची मोठी कामगिरी अफु ची तस्करी करणारे राजस्थान राज्यातील दोघांना घेतले ताब्यात...!
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागांची मोठी कामगिरी अफु ची तस्करी करणारे राजस्थान राज्यातील दोघांना घेतले ताब्यात...!
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपुर मुंबई आग्रा महामार्गावरून अफूची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. या कारवाईत राजस्थान राज्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 12 लाखाची अफू जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कारसह सुमारे वीस लाखांचा ऐवज जप्त केला असून या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मानवी मेंदूवर परिणाम करणारे प्रतिबंधित अफूची तस्करी करणाऱ्यांची माहिती घेवुन कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते.
यापूर्वी मुंबई आग्रा महामार्गावरून शिरपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गुंगीकारक वनस्पतीचा तस्करीचे
प्रकार घडले आहेत.या संदर्भात पोलिसांनी कारवाया देखील केले आहेत.याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर तालुक्यातून मध्य प्रदेशाच्या सीमावरती भागाकडून येणाऱ्या रस्त्यांवर आपले लक्ष केंद्रित केले होते.यासाठी ठीक ठिकाणी तपासणी करण्यास सुरुवात देखील केली.गोपनिय माहितीचे आधारे, शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाच्या शिवारातील चारणपाडा गावाचे स्पीड ब्रेकरवर नाकाबंदी करुन, सेंधवा (मध्यप्रदेश) कडून शिरपूरकडे जाणारी हुंडाई आय 20 कार क्र. जीजे-37/जे -4070 हिस अडथळा निर्माण करुन थांबवुन तपासणी केली असता, चालक रमेशकुमार मानाराम बिश्नोई, वय-33 वर्ष, (रा.कालीराणा नगर,भोजासर,राजस्थान),राकेशकुमार मांगीलाल बिश्नोई, (रा.गांव खारा, राजस्थान) यांच्या ताब्यातील कारमधील डिक्कीत मानवी मेंदुवर परिणाम करणारा अफु (डोडा) मिळुन आला आहे.डिक्कीत सुमारे 11 लाख 82 हजार 800 रुपये किमतीचा 59 किलो अफूचा साठा आढळून आला. पोलिसांनी कार आणि मोबाईल सह सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.हि कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि.अमित माळी,असई शाम निकम,पोहेकॉ पवन गवळी, आरीफ पठाण,पंकज खैरमोडे, देवेंद्र ठाकुर, पोकॉ.मयुर पाटील, राजीव गिते आणि शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोउनि जयराज शिंदे, असई कैलास जाधव, पोहेकॉ शेखर बागुल, मनोज पाटील, धनराज गोपाळ, इसरार फारुखी यांनी केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा