Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ मार्च, २०२५

शिरपूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई कृष्णा सोनवणे सह पाच लाखांचा गुटखा जप्त..!



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला असून, हा मुद्देमाल पाच लाख रुपयांच्या आसपास आहे. १५ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजता शिरपूर शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सपोनि हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रल्हाद तात्या नगर येथील तपन भाई पटेल मार्गावर छापा टाकला. या कारवाईत कृष्णा सिताराम सोनवणे (वय ५४,रा.सांगवी, ता.शिरपूर) याच्या वाहनात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवलेला आढळला. पोलिसांनी त्याच्या वाहनाची तपासणी केली असता, १.८२ लाख रुपयांचा सुगंधित विमल पान मसाला आणि ७८ हजार रुपयांचा तंबाखू पान मसाला जप्त केला. याशिवाय, गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरलेल्या डिझायर कारला देखील जाम करण्यात आले आहे.

संशयित कृष्णा सोनवणे याच्या विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ तसेच भारतीय दंह संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, गुटख्याचा पुरवठादार आणि वाहनाचा मूळ मालक कोण हे लवकरच उघड होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध