Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ मार्च, २०२५

बेकायदेशीर वृक्षतोडीची तक्रार केल्यामुळे पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर नोंदविला खोटा गुन्हा.साक्री पत्रकार,समाजसेवकांचे पोलीस उपअधीक्षकांना दिले निवेदन



पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील जंगलामध्ये सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड प्रकरणाची तक्रार केल्यामुळेच पत्रकार उमाकांत अहिराव यांना धमकी देत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. यासंदर्भात साक्री तालुक्यातील पत्रकार, समाजसेवक आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनदेत संबंधित भ्रष्ट वनरक्षक तारा चौरे यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार उमाकांत अहिराव (वय ३०, रा. देगाव ता. साक्री) यांनी दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी धुळे जिल्ह्याच्या वनसंरक्षक निनू सोमराज यांच्याकडे पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील चरणमाळ परिमंडळातील नांदरखी बीट मधील कंपार्टमेंट क्र. ७८ व ९७ मध्ये सुरू झालेल्या मोठ्या प्रमाणात अवैध सागवान आणि झाडांची तोड
याविषयी लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर वनसंरक्षकांच्या आदेशानंतर गस्तीपथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली असता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व अतिक्रमण झाल्याचे आढळून आले.चौकशी दरम्यान वनरक्षक तारा चौरे यांनी आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून पत्रकार अहिराव यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला.एवढेच नव्हे,जर कारवाई झाली तर मी आत्महत्या करेल,अशी धमकीही त्यांनी दिल्याचे
निवेदनात नमूद केले आहे.परंतु उमाकांत अहिरराव यांनी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यानंतर संबंधित वनरक्षक
चौर यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्या विरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला.
तरी या प्रकरणाची पारदर्शी चौकशी होऊन संबंधित वनरक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अरूण अहिरराव,प्रविण काकुस्ते, संदिप बच्छाव,हर्षल ठाकरे,कैलास भदाणे,हरिश मंडलिक,अजय अहिरे,शैलेश गाडेकर,निलेश तोरवणे,रतीलाल सोनवणे,चंद्रशेखर अहिरराव, प्रविण बोरसे,भैय्यासाहेब पारधे,भैय्यासाहेब देसले, राहुल गवळे,अनिल देसले, योगेश चोपडे,तुषार ढोले सयाजीराव ठाकरे यांची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध