Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ मार्च, २०२५

जैसी करनी वैसी भरणी लाचखोर औषध निरीक्षक किशोर देशमुख यांच्या घरातून ४९ लाख ७३ हजार ९५० रुपयांचा घबाड जप्त..!



शिरपुर धुळ्यातील अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक किशोर देशमुख यांच्या घरातून घबाड सापडले आहे.धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एकाच वेळी त्यांच्या धुळे आणि जळगाव येथील घरात छापा टाकला असता ४९ लाख ७३ हजार ९५० रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने आढळून आले आहेत.

धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक किशोर देशमुख आणि खाजगी पंटर तुषार भिकचंद जैन यांना आठ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या पथकाने एकाच वेळी देशमुख यांच्या धुळे आणि जळगाव येथील निवासस्थानी झडती घेतली. यात त्यांना मोठे घबाड आढळून आले आहे. घरझडतीमध्ये एकुण ३२ लाख ५ हजार १०० रुपये रोख रक्कम व १७लाख ६८ हजार ८५० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने असा एकुण ४९ लाख ७३ हजार ९५० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख यांचे जळगांव येथील राहते घराची घरझडती घेतली असता ३१ लाख ३० हजार १०० रुपये रोख, १७लाख ४६ हजार १०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तसेच २२ हजार ७६० रुपये किमतीचे चांदीने दागिने मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले. त्याची चौकशी सुरु आहे.

औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख यांचे धुळे येथील राहते घरात ७५ हजार ८१० रुपये रोख रक्कम मिळुन आल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दि.१३ मार्च पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास ला.प्र. विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर व धुळे ला.प्र.विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी या करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध