Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ मार्च, २०२५

शिरपूर पोलीसांची मोठी कामगिरी अडीच लाखांच्या चार दुचाकींसह दोघांना केले गजाआड



शिरपूर/प्रतिनिधी:- येथील शहर पोलिस ठाण्याचे नव नियुक्त निरीक्षक किशोर परदेशी यांनी वाहन चोरांना दणका देत चोरीच्या चार दुचाकी जप्त करून दोघा जणांना गजाआड केले. या दुचाकीची किंमत दोन लाख साठ हजार रुपये आहे. एक संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध नरडाणा व नंदुरबार येथे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती श्री. परदेशी यांनी दिली. शहरातील कांती नगर येथील रहिवासी हर्षल किशोरसिंग गिरासे यांच्या मालकीची होंडा शाईन ही दुचाकी पाच कंदील येथील भंडारी मेडिकल येथून १५ सप्टेंबर २४ रोजी चोरीस गेली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १६ मार्च रोजी शहरात पोलिस गस्तीवर असताना त्यांना दोन व्यक्ती त्यांच्या ताब्यातील दुवाळीने फिरत असल्याचे दिसून आले. त्यांना या दुचाकी बाबत संशय निर्माण झाल्याने त्यांनी दोघा तरुणांची चौकशी केली मात्र त्यांनी पोलिसांना उडवा उड वीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले संशयित तुषार शालीग्राम कोळी (२९, रा. म्हळसर, ता. शिंदखेडा) व विपुल नागराज पाटील (१९, रा.वषी, ता.सिंदखेडा) यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याची कबुली देत अन्य तीन दुधावी चोरी केल्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी या सर्व चार दुधाकी जप्त केल्या आहेत त्यांची किंमत दोन लाख साठ हजार रुपये आहे. संशयित तुषार कोळी हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध नरडाणा व नंदुरबार येथील पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक विशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशेर परदेशी, शोध पथकाचे हवालदार राजेंद्र रोकडे रविद्र आखडमल , विनोद आखडमल, भटू साळुंके, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, सचिन वाघ, आरिफ तडवी, मनोज महाजन, मनोज दाभाडे, चालक रवींद्र महाले, होमगार्ड मिधुन पवार, राम भिल यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध