Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ मार्च, २०२५
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न...!
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने संत सेना भवन सिडको नाशिक येथे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांना स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आलेत. महासंघाच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाषजी बसवेकर, जेष्ठ आरटीआय कार्यकर्ते राहुल भारती, मा.अ.का.म. संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शंकर वडवले, राज्य कार्यकारणी सदस्य साहेबराव वाघ, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील, युवा कार्यकर्ते अभिषेक बसेवेकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक पडवळ, धुळे जिल्हा अध्यक्ष पुनमचंद मोरे, नाशिक जिल्हा अध्यक्ष सुभाष दराडे, इगतपुरी तालुका अध्यक्ष किरण धुमाळ नागेश मोरे, पंढरीनाथ कन्नोर, उपस्थित होते.
मा.अ.का.म. संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले कि आपण समाजातील तळागाळातील घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असतो परतू माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणी, प्रशासनातील मुजोरी, माहिती नाकारण्याची वाढती प्रवृत्ती, सरकारी कार्यालयातील सरकारी बाबू हे खूप निर्ढावलेले आहेत हे जनतेला व कार्यकर्त्यांना सहजा सहजी माहिती उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे आपला महासंघातील प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे त्याला माहिती अधिकार कायद्याचे सखोल ज्ञान असले पाहिजे, कुठल्याही सरकारी निमसरकारी कार्यालयातून माहिती घेण्यासाठी जन माहिती अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण अर्ज कसा करावा, त्यांनी माहिती न दिल्यास अथवा नाकारल्यास प्रथम अपील व द्वितीय अपिलात जाऊन कश्या पद्धतीने पाठ पुरावा करायला हवा या विषयी सखोल माहिती दिली. प्रत्येक सरकारी कार्यलयात नागरिकांची सनद, माहिती अधिकार अधिनियम ४ (१) ख मधील १ ते १७ मुद्याची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात लावायला भाग पाडणे व त्यानुसार त्या त्या सबंधित कार्यालयात प्रत्येक सरकारी अधिकारी व कर्मचारी वर्तन करीत आहेत का याचे निरीक्षण कार्यकर्त्यांनी करायला हवे व जनतेस सहज माहिती मिळावी यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी
पाठपुरावा करावा, राज्य कार्यकारणी सदस्य साहेबराव वाघ यांनी सांगितले कि नाशिक खंडपीठात राज्य महिती आयुक्त हे मनमानी पद्धतीने कार्यभार करीत आहेत. कार्यालयातील उपसचिव सांगळे व कातकाडे हे अर्जदारांना उडवा उडवीचे उत्तरे देतात, या कार्यालयात एका दिवसात जवळपास २०० पेक्षा जास्त सुनावण्या घेऊन अर्जदारांची बोळवण केली जाते. अर्जदारांना झालेल्या सुनावणीचे वर्षभर निकाल मिळत नाहीत. खंडपीठाच्या कार्यालयात माहिती घेण्यासाठी आलेल्या अर्जदारांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. या संधर्भात मुख्य आयुक्त यांना अनेक तक्रारी करून हि काही हि उपयोग नाही उलट मुख्य आयुक्त यांच्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम करीत आहे व माहिती अधिकार कायद्याला हि मंडळी दुबळा बनवण्याचे काम करीत आहेत. असेच सुरु राहिल्यास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल.
या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काम करीत असताना येणाऱ्या अडचणी मांडल्यात व मान्यवरांनी या सर्व अडचणीचे निरसरण केले. या कार्यकर्ता मेळाव्यास नाशिक जिल्ह्यातून व नाशिक जिल्ह्या बाहेरील २०० कार्यकर्ते उपस्थित होते. कार्याक्रमचे सुत्रसंचालन सुभाष दराडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन किरण धुमाळ यांनी केले.
महेश एम. पाटील उत्तर महारष्ट्र कार्याध्यक्ष मो. न – ९०७५०४२९५५
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा