Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ मार्च, २०२५

दामिनी शहर स्तर संघ बचतगटातर्फे महिला दिन साजरा विविध स्पर्धांचे आयोजन



शिरपूर (प्रतिनिधी)शिरपूर वरवाडे नगरपरिषद,शिरपूर दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उजीविका  अभियान आणि दामिनी शहर स्तर संघ बचत गट शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिन डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान शिरपूर येथे विविध प्रकारचे कार्यक्रम व विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला. 
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ सरोदे मॅडम ,माजी नगराध्यक्ष सौ संगीता देवरे मॅडम ,माजी उपनगराध्यक्षा सौ छायाताई ईशी मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विविध स्पर्धा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्यात. प्रत्येक स्पर्ध्येतीळ विजेत्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  
        
रांगोळी  स्पर्धा विजेते प्रथम  क्रमांक तनुजा शेटे, दुसरा क्रमांक स्नेहल वाघ, तिसरा क्रमांक मनीषा भोई,संगीत खुर्ची मध्ये प्रथम  क्रमांक   सोनाली पाटील ,दुसरा क्रमांक  रंजना चौधरी,तिसरा क्रमांक सरला येशीराव,उखाणे स्पर्ध्येमध्ये प्रथम क्रमांक पल्लवी  मराठे ,दुसरा क्रमांक नम्रता पाटील,तिसरा क्रमांक वंदना मराठे,लिंबु चमचा 
स्पर्ध्येमध्ये प्रथम क्रमांक पुष्पा भोई, दुसरा क्रमांक सुनीता पाठक,तिसरा क्रमांक सुनीता दाभाडे,बास्केट मध्ये बॉल टाकणें प्रथम क्रमांक मंगला सोनार , दुसरा क्रमांक सीमा पाटील, तिसरा क्रमांक रुबिना पिंजारी, गोणपाठ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नूतन ठाकरे, दुसरा क्रमांक सुनंदा ढोले,तिसरा क्रमांक अनुराधा धनगर,रनिंग मध्ये प्रथम क्रमांक सुनीता बोरसे ,दुसरा क्रमांक पुजा खोंडे,तिसरा क्रमांक आशाबाई भोई सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
        
शिरपूर नगरपरिषद मध्ये बांधकाम सुरु आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन शितल मराठे यांनी केले 
    
दामिनी शहर स्तर संघाचे अध्यक्ष ज्योतीबाई गोविंद चौधरी, सचिव संगीता आखाडे यांच्या  मार्गदर्शनाखाली  सदस्या मंगलाबाई पाटील, संगीताबाई माळी ,देविका बैसाणे, संगीता सुतार, चेतना पाटील, मनीषा माळी व गटाच्या महिला भगिनी यांनी परिश्रम घेतले तसेच शिरपूर वरवाडे नगरपरिषद चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे ,प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, अहिरे सर आणि नागेश सर यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी शिरपूर शहरातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध