Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ६ मार्च, २०२५

छावा हा हिंदी चित्रपट टॅक्स फ्री करावा यासाठी धुळ्याचे आमदार धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



धुळे ’छावा’ हा हिंदी चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी आ.अनुप अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
देव-देश-धर्मासाठी कायम आघाडीवर असलेल्या आ.अनुपभैय्या अग्रवाल यांनी प्राणाचे बलिदान देत हिंदू धर्माचा स्वाभिमान कायम राखणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची प्रत्येक हिंदू धर्मियास जाणिव व्हावी म्हणून त्यांच्या छावा चित्रपटाला टॅक्स फ्रि करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, की मराठी मनाचा मानबिंदू, बहुजन प्रतिपालक’मराठा’ समाजाचे दैवत तथा बहुजन समाजाची अस्मिता,अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित नुकताच प्रसिद्ध झालेला ’छावा’ हा हिंदी चित्रपट महाराष्ट्र शासनाने टॅक्स फ्री करावा अशी नम्रपणे मागणी आम्ही धुळे शहराचे आमदार या नात्याने आपणाकडे करीत आहोत.
सादर मागणीचा आपण स्वीकार करावा, अशी तमाम धुळेकर ’रयतेची’ मागणी आम्ही आपणापर्यंत आमदार या नात्याने पोचवत आहोत. तरी आमच्या मागणीचा स्वीकार करावा. या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठविण्यात आली आहे असे आ.अनुप अग्रवाल यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध