Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ मार्च, २०२५

तरुणीचा विनयभंग व तिच्या आईला गंभीर दुखापत




तरुणीचा विनयभंग व तिच्या आईला गंभीर दुखापत

    अमळनेर : आमच्या घरासमोरून का जातो या कारणावरून भांडण करत तिघानी एका तरुण ,त्याची बहीण व आईला मारहाण करून बहिणीचा विनयभंग तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना २४ नोव्हेंबर २०२४  रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एलआयसी कॉलनीत घडली.

     🔷पीडित तरुणीने फिर्याद दिली की २४ नोव्हेंबर रोजी तिचा भाऊ जात असताना एलआयसी कॉलनीतील योगेश बोरसे व प्रणव बोरसे यांनी त्याला अडवून तू आमच्या घरासमोरून का जातो म्हणून शिवीगाळ आणि मारहाण करीत होते. त्यावेळी तरुणीची आई भांडण सोडवायला गेली असता योगेश वसंत बोरसे व प्रणव बोरसे यांनी त्याच्या आईला केस ओढून सिमेंटच्या रस्त्यावर खाली पाडले त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. त्याचवेळी चंद्रकांत बोरसे तेथे आला व त्याने तरुणीचा हात ओढून अश्लील वर्तन केले. तरुणीच्या आईला दुखापत झाल्याने तिला ग्रामीण रुग्णालय तेथून नर्मदा फौंडेशन व नन्तर धुळे येथील ओम क्रिटिकल मध्ये दाखल केले होते. महिला बेशुद्धावस्थेत दोन महिने दवाखान्यात असल्याने तरुणीने पोलिसात फिर्याद दिली नव्हती. तरुणीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला  योगेश ,प्रणव व चंद्रकांत तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ ,११५ ,११७ , ३५१(२),३५२ , अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(र)(एस), ३(२)(व्ही ए) , ३ (१)(डब्ल्यू)(१)(२) प्रमाणे मारहाण ,विनयभंग , ऍ ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध