Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

मोबाईल मध्ये सट्टा जुगार खेळणाऱ्या सात जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल


प्रतिनीधी:- गणेश चव्हाण

अमळनेर : मोबाईल मध्ये सट्टा जुगार खेळवून पैसे स्वीकारताना पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडून मोबाईल मधील सात नावे शोधून त्यांच्यावरही कारवाई केल्याची घटना १० रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली.


पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की मच्छी मार्केट च्या भिंतीच्या आड बोरसे गल्लीतील रहिवासी दिवाकर पांडुरंग ठाकूर वय ३३ हा मोबाईल मध्ये मिलन नावाचा सट्टा जुगार खेळवत असल्याची माहिती मिळताच त्यांनी हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे , अमोल पाटील ,जितेंद्र निकुंभे याना धाड टाकायला पाठवले तेव्हा दिवाकर सट्टा जुगार खेळताना आढळून आला. त्याच्याजवळील मोबाईल तपासला असता तो संजू बाबा या नावाच्या व्हाट्सअप ग्रुपवर आकडे आणि पैश्यांचे व्यवहार आढळून आले. पोलिसांनी त्यातील नाव नम्बर शोधली असता अडमिंन अदनान शेख , आकाश उर्फ डॅनी जेधे , नाना चौधरी , मनी , डी ,संजुबाबा असे आढळून आले. अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कलम १२ अ प्रमाणे दिवाकर सह व्हाट्सएप ग्रुप ऍडमीन असे सात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध