Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५
चोरांचा सरदार पीएसआय मांटे चोरांसह पोलिस कोठडीत
चोपडा प्रतिनिधी : सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोरांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सरदार बनलेल्या पीएसआय प्रल्हाद पिरोजी मांटे याच्यासह त्याच्या तिघा साथीदारांना पोलिस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. चोपडा शहर पोलिसांच्या कारवाईत जालना येथील पीएसआय प्रल्हाद पिरोजी मांटे व त्याचे सराईत गुन्हेगार सहकारी अडकले. चोपडा बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे 35 हजार रुपये घेवून पळून जात असलेल्या चौघा चोरट्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्यात चोपडा शहर पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले.
महाराष्ट्रातील विविध बसस्थानकांवर झालेल्या अनेक चोऱ्यांमध्ये पीएसआय प्रल्हाद मांटे याचा हात असल्याचे म्हटले जात आहे. कित्येक वर्ष बसस्थानकावरील प्रवाशांचे निरीक्षण आणि त्यातून चोरीच्या विविध युक्त्या त्याला सुचल्या. सेवानिवृत्तीला तिन महिने बाकी असतांना जालना येथील पीएसआय प्रल्हाद मांटे हा पोलिस कारवाईत अडकला आहे. चोपडा बसस्थानकावर चोरी करण्यासाठी आला असतांना त्याच्यावर पोलिसांची झडप पडली आणि त्याने आपला गुन्हा कबुल केला.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
शिरपूर प्रतिनिधी:प्रियदर्शनी मूकबधिर विद्यालय शिरपूर जिल्हा धुळे मुलांच्या शैक्षणिक,बौद्धिक विकास व करमणूक व्हावी या दृष्टिकोनाच्या हेतूने र...
-
शिरपूर : (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आशितोष बहूद्देशिय संस्था शिरपूर संचलित प.पू.साने गुरुजी माध्य.वि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा