Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ एप्रिल, २०२५
Home
/
Unlabelled
/
आज चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभाग जिल्हा भरारी पथकाच्या कारवाईत प्रतिबंधित सुमारे अठरा लक्ष रकमेचे बनावट HTBT कापूस बियाणे जप्त व संशयित आरोपीवर गुन्हा दाखल.
आज चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभाग जिल्हा भरारी पथकाच्या कारवाईत प्रतिबंधित सुमारे अठरा लक्ष रकमेचे बनावट HTBT कापूस बियाणे जप्त व संशयित आरोपीवर गुन्हा दाखल.
जळगाव जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के,पोलिस निरीक्षक मधुकर साळवे पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा नियोजन करण्यात आले.
जिल्हा भरारी पथकातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे,जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार,किरण पाटील कृषी अधिकारी,
पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील,विद्या इंगळे,प्रकाश मथुरे,समा तडवी या पथकाने चुंचाळे येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळे अक्कुल खेडा रोडवरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे १२७३ पाकिटे १७ लाख ८२ हजार २०० किमतीचा बियाणे साठा जप्त केला असून बियाणे कायदा,बियाणे नियम,अत्यावश्यक वस्तू अधिनियम,महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम,पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी फिर्याद दाखल केली तर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा