Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ मे, २०२५

भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील पळाले




अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली.


भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये सर्वसाधारण बोगीत एक जोडपे अवघ्या एक महिन्याच्या बाळाला घेऊन धरणगावला चढले. रेल्वे डब्यातच त्यांनी आपल्या बाळासाठी झोका बांधला. आणि अमळनेर येताच दोन्ही पती पत्नी उतरून गेले. रेल्वे दोंडाईचा पर्यंत गेल्यानन्तर प्रवाश्यांच्या लक्षात आले. त्यांनी रेल्वे पोलिसांना बोलावले. रेल्वे पोलीस अनिता चौधरी , अलका अढाळे यांनी बाळाला नंदूरबार रेल्वे स्थानकावर उतरवून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.


अमळनेर स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नेमके सर्वसाधारण बोगीतून कोण उतरले हे कळू शकले नाही तर धरणगाव रेल्वे स्थानकावर देखील कॅमेरे नसल्याने बाळाला घेऊन रेल्वेत कोण चढले हे समजू शकले नाही. त्यामुळे बाळाचे आई वडील शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध