Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० मे, २०२५

साक्री तालुक्याचे प्रगतीचे शेतकरी विशाल खैरनार यांनी घेतले कलश सिड्स चा कलिंगडाचे विक्रमी उत्पादन



साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे दोन हायब्रीड टरबूज मेलोडी व कँडी या दोन वाणांची दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ला लागवड केली होती. त्यांनी केवळ 75 ते 80 दिवसात टरबूज या पिकाचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि पाण्याच्या कमतरता यावर मात करत रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे तसेच सेंद्रिय खतांची जोड योग्य औषधांचे नियोजन करून तीन एकर क्षेत्रात या टरबूज पिकाची लागवड केली तीन एकर क्षेत्रामध्ये एकूण 75 बेड त्यांनी तयार केले होते तसेच एका बेडमध्ये सरासरी एक टन माल त्यांना मिळाला. म्हणजेच 75 बेड मध्ये सुमारे 80 टणापर्यंत उत्पन्नाचा अंदाज त्यांना आला आहे.एक फळाच वजन कमीत कमी आठ किलो व जास्त जास्त बारा किलो वजन मिळाले आहे.या कलिंगडचा प्लॉटवर काल कलश सिड्स प्रा.लि.कंपनीचा फिल्ड डे चा पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात साधारणता दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी परिसरातील बेहेड विठाई,पेरेजपूर,दारखेल, धमनार,दातर्ती,कासारे या गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते कलश सीड्स या कंपनीचे रिजनल मॅनेजर राहुल निकम टेरिटरी मॅनेजर रामेश्वर अंबळकर तसेच फील्ड ऑफिसर सागर धनगर यांनी शेतकऱ्यांची चर्चा करताना संबोधित केले की कलश सिडस च्या मेलोडी व कँडी या दोन्ही व्हरायटीज विक्रमी उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आहेत केवळ 75 दिवसात काढणीस येतात या वाणांचा रंग आकार आणि चव हि अतिशय उत्तम आहे भविष्यात टरबूज लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी या दोन्ही वाणांची हमखास लागवड करावी व त्यातून आपली आर्थिक प्रगती साधावी कारण याला बाजारात भाव देखील योग्य मिळतो.या वानाला रोगप्रतिकारशक्ती ही चांगली आहे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो यासाठी जास्तीत जास्त ऑरगॅनिक खतांचा व औषधांचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढवावे असे आवाहन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले.या कार्यक्रमात शेतकऱ्यांना चहा व नाश्त्याची हि सोय होती.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध