Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ मे, २०२५

शिरपूर येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सर्व देशप्रेमी बंधू,भगिनी यांनी या भव्य तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करुन टाकले. तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान केले. भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ पक्षातर्फे देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.


सदर जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा १९ मे रोजी सकाळी ८ वाजता शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून आर.सी.पटेल मेन बिल्डिंग समोरून, शिरपूर वरवाडे नगरपालिका, कुंभार टेक, पाटील वाडा, स्वामी रेडियम कडून गुजराथी कॉम्प्लेक्स, मेन रोड ने श्री पाताळेश्वर मंदिर चौक येथील स्वातंत्र्य सैनिक स्मारक येथे तिरंगा यात्रेचा समारोप होईल.

या तिरंगा यात्रेत म्हणजेच राष्ट्रीय कार्यक्रमात नागरिक, महिला, युवा वर्ग यांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती के.डी.पाटील, भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, होळनांथे मंडळ अध्यक्ष विरपाल राजपूत आदींनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध