Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ मे, २०२५

दहावीत ९५.८० टक्के गुण मिळवणाऱ्या तनिष्का जैनचे माजी नगराध्यक्षांकडून कौतुक



शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत पूर्ण केले आहे. या यशाबद्धल माजी नगराध्यक्षांनी त्यांचे घर गाठून तनिष्काचा सत्कार करून प्रोत्साहन दिले.   

शिरपूर येथील तनिष्का जैन हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत  तब्बल ९५.८० गुण मिळवून आपल्या शाळेच्या आणि कुटुंबाच्या यशाची पताका फडकवली आहे.तिने मराठी , इंग्रजी,हिंदी,गणित,विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या सर्वच विषयात उत्कृष्ट गुण प्राप्त करीत नेत्रदीपक यश मिळवले आहे.तिच्या या या घवघवीत यशाबद्दल सोशल मीडिया वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे शिरपूरचे माजी नगराध्यक्षा संगिता देवरे यांनी चक्क तनिष्का जैन हिचा घराचा तपास लावत भेट दिली. तिच्याशी  चर्चा करीत सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पेढा भरवत कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात 

तनिष्का ने नियमित अभ्यास कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश डोळ्या समोर आल्याचे तनिष्काने सांगितले. या भविष्यात विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन उच्चपदस्थ अधिकारी होण्याची इच्छा आहे.तिच्या या यशाबद्दल आजी आजोबांकडून कौतुक करण्यात आले शिक्षक आणि मैत्रिमंडळी,नातेवाईक आदींनी आनंद व्यक्त केला आहे.ती गणेश ट्रेडिंग कंपनी चे संचालक तथा साप्ताहिक लोकाभिमुख चे संपादक ललित जैन यांची पुतणी  आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध