Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ मे, २०२५

जंगल साभाळणारा घोडा वीज चमकताच घोडा ठार*




अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

  सायंकाळी अवकाळी पावसासह वीजेच्या कडकडाट झाला. गावकऱ्यांनी गावचे जंगल सांभाळण्यासाठी राहुल बाळू वडार याला त्याच्या खाजगी घोड्यासह एक लाखात कंत्राट दिला होता. तो आपल्या गावी गेल्याने त्याने घोडा  गोकुळ धोंडू पाटील यांच्या शेतात बांधला होता. सायंकाळी वादळी वारा ,पाऊस सुरू झाला आणि वीज चमकू लागली. वीज चमकताच घोडा जमिनीवर कोसळून ठार झाला. घोड्याच्या अंगावर मात्र कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. घोड्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध