Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २६ मे, २०२५

मध्य प्रदेशातून येणारी दारू केली जप्त; शिरपूर दारूबंदी विभागाची कारवाई......



शिरपूर प्रतिनिधी - पळासनेर शिवारातील मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूरच्या दारूबंदी विभागाने सापळा लावत पर राज्यातील 27 बिअरचे बॉक्स जप्त करत दारू माफीयांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत वाहनासह पाच लाख 43 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत वाहन चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील बिअर महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती शिरपूर दारूबंदी विभागाला मिळाले होते. मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर दारूबंदी विभागाने पळासनेर शिवारात सापळा लावत कारवाई केले आहे. यात वाहनाची तपासणी केली असता 27 बिअर चे बॉक्स आढळून आले आहे. वाहनासह मुद्देमाल जप्त करत वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शिरपूर दारूबंदी विभाग करत आहे.

सदरची कारवाई दारूबंदी विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, नाशिकच्या विभागीय उपायुक्त डी आर वर्मा, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती काकडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे, निरीक्षक ए पी मते यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक एस जी चौथवे, जवान हेमंत पाटील, निलेश मोरे, प्रशांत बोरसे, शांतीलाल देवरे, केतन जाधव आदींच्या पथकाने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध