Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ मे, २०२५
Home
/
Unlabelled
/
आटाचक्की वितरण प्रसंगी संसद रत्न मा.खा.डॉ.हिनाताई गावित यांचे आवाहन रोजगार देणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे.
आटाचक्की वितरण प्रसंगी संसद रत्न मा.खा.डॉ.हिनाताई गावित यांचे आवाहन रोजगार देणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे.
नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थलांतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग असलेले बचत गट मोठ्या संख्येने स्थापन करणे, त्यांना कुक्कुटपालन शेती प्रक्रिया उद्योग आणि तत्सम लघु उद्योगासाठी प्रोत्साहित करणे तसेच केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून अधिकाधिक लाभ मिळवून देणे; अशा स्वरूपात विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे भरीव कार्य खासदार असताना संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी केले आहे.
त्याच पद्धतीने रोजगार देण्याचे काम त्यांनी अद्यापही सुरू ठेवले असून त्याच अंतर्गत आज दिनांक 23 मे 2025 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत शेषनिधीतून धीरजगाव येथील दिव्यांग लाभार्थी योगेश धरमसिंग वळवी यांना संसदरत्न मा.खासदार डॉ.हिनाताई विजयकुमार गावित यांच्याहस्ते आटा चक्कीचे वितरण करण्यात आले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून युवकांसाठी विविध योजना देत असते त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांना आधार देण्यासाठी आपण सदैव सज्ज आहोत, त्यांनी योजनांचा लाभ घ्यायला पुढे यावे; असे आवाहन डॉक्टर हिनाताई गावित यांनी याप्रसंगी केले.
प्रसंगी बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण
धीरज गावचे सरपंच अशोक वळवी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पवार जगदीश पाटिल संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य प्रेम चव्हाण भवालीचे सरपंच गोविंद नाईक रोहित पवार पुरुषोत्तम चव्हाण राजू पवार किशोर पवार भोलेनाथ वळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा