Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ मे, २०२५

चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार




अमळनेर :  चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ येथील गॅनी च्या ढाब्याजवळ घडली.*



     ताडेपुरा येथील भटू दिलीप पाटील वय २९ हा आपल्या रिक्षा क्रमांक एम एच ४१ ए एक्स १३५६ वर लोंढवे येथे पॅसेंजर सोडायला गेला होता. तो लोंढाव्याहून अमळनेर परत येत असताना अमळनेरकडून जाणाऱ्या एका चारचाकी एम एच१८ ए जे ५५८८ ने भरधाव वेगाने येऊन जोरात धडकदिल्याने रिक्षा चालक जागीच ठार झाला. चारचाकी चालक अविनाश भैय्यासाहेब पाटील रा दहिवद याच्या विरुद्ध  भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) ,२८१, १२५ (अ),१२५(ब), ३२४(४) ,मोटरवाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत. 

      भटू याने प्रेमविवाह केला असून नवे घर बांधायला घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध