Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ मे, २०२५
Home
/
Unlabelled
/
धुळ्यातील विश्राम गृहात सापडले कोट्यावधींची घाबड;अंदाज समितीचे अध्यक्ष आ.अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहाय्यक यांनी पैसे गोळा केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप.
धुळ्यातील विश्राम गृहात सापडले कोट्यावधींची घाबड;अंदाज समितीचे अध्यक्ष आ.अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहाय्यक यांनी पैसे गोळा केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप.
धुळे,नंदुरबार जिल्ह्या मध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात दाखल झालं होत.धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती.
अंदाज समितीच्या शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांमध्ये त्रुटी आढळून आल्यान अनेक शासकीय कार्यालयांमधून गुलमोहर शासकीय विश्राम गृह या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता.आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्राम गृह येथे दुपार पासूनच पहारा देण्यात आला होता.दरम्यान यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक यांसह इतर अधिकाऱ्यांना संपर्क देखील केला मात्र,एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचे देखील अनिल गोटे यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलत असताना सांगितल असून स्वतः अनिल गोटे यांनी गेल्या तब्बल 5 तास कुलूपबंद रूम बाहेर ठिय्या मांडला होता.दरम्यान अर्जुन खोतकर या आमदारांच्या खासगी स्वीय सहायकाच्या नावानं गुलमोहर शासकीय विश्राम गृह या ठिकाणी रूम आरक्षित करण्यात आला होता.आणि याच ठिकाणी कोट्यवधी रुपये शासकीय कार्यालयामधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केल्या नंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांच्या मदतीने शासकीय विश्राम गृहाचे 102 रूम चे कुलूप तोडून अखेर तपासणी केल्या नंतर त्या रूम मध्ये 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड मिळून आली आहे.
जवळ पास 3 मशीन द्वारे रात्री उशिरा पर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते.रात्र भर शासकीय विश्राम गृह बाहेर नागरिक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.अखेर इतके पैसे नेमके कुठून आले कुठून आणि कोणी दिले या बाबत आता पोलिस चौकशी करीत आहे..
धुळ्यात आलेल्या समिती मधील 11 आमदार यांची नावे
समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर,समिती सदस्य आमदार काशिराम पावरा,दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे,मनिषा चौधरी,किशोर पाटील,किरण सामंत,शेखर निकम,कैलास पाटील,सदाशिव खोत,राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अप्पर सचिव (समिती) दामोदर गायकर हे 11 जण उपस्थित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी वि...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा