Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ मे, २०२५

गरीबाची झोपडी जळाल्याने काशिनाथला शासन देईल का मदत




🛑 _अमळनेर : झोपडीला अचानक आग लागल्याने बोदर्डे येथील काशिनाथ दिलभर भिल या वृद्धाचे कुटुंब उघड्यावर आले असून संसार उध्वस्त झाल्याची घटना २६ रोजी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोदर्डे गावात घडली_

काशीनाथ भिल आपल्या पत्नीसह मुलगा सून नातवंडे यांच्यासह झोपडीत राहतो. परिस्थिती हलाकीची असल्याने दुसर्याकडून वीज कनेक्शन घेऊन कामापुरता वीज वापरत होता. २५ रोजी रात्री काशिनाथ घरात चिमणी लावून झोपला होता. कुटुंबांतील इतर सर्व सदस्य समोर एका ओट्यावर झोपले होते. २६ रोजी पहाटे अचानक घराला आग लागली. काशिनाथ जेमतेम घराबाहेर पडला आरडाओरडा सुरू झाला लोक गोळा झालें तोपर्यंत झोपडी जाळून खाक झाली होती. काशीनाथ ने ऊस तोडणीचे मिळालेले रोख रक्कम देखील घरात ठेवली होती. पैश्यांसह घरातील संसारोपयोगी वस्तू, धान्य, कपडे, पैसे, दूरदर्शन संच, तसेच महत्त्वाची कागदपत्रेही जळून गेले. संपूर्ण संसार उध्वस्त झाल्याने कुटुंब उपासमारीच्या संकटात सापडले आहे. त्यांच्या अंगावर देखील कापड राहिलेले नाही. काही अल्युमिनियम चे भांडे वितळले आहेत.


काशिनाथ भील हे अत्यंत गरीब परिस्थितीत कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र या आगीने त्यांच्यावर काळाचा घाला घातला असून सध्या त्यांच्याकडे निवाऱ्यासाठीही काहीच उरलेले नाही. प्रशासनाने या दुर्घटनेची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत व आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. स्थानिकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध